23.3 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

लिंगेश्वर युवा – कला क्रीडा मंडळ हळवलच्या वतीने दहावी – बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

कणकवली | मयुर ठाकूर : एखादी संस्था काढणं खूप सोपं असत. मात्र ती टिकवण खूप कठीण आहे. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ मागील २० वर्षे सातत्याने सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे, असे गौरवोदगार जिल्हा परिषद शाळा हळवल नं. २ चे मुख्याध्यापक शिमराम सुतार यांनी काढले. लिंगेश्वर युवा – कला क्रीडा मंडळाच्यावतीने दहावी – बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार कारण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष लवू परब, प्रशालेचे शिक्षक स्वप्नील सावंत, हळवलचे माजी उपसरपंच अरुण राऊळ, दिपक राऊळ, वामन परब, सान्वी गावडे, विजया चव्हाण, सचिव दिपेश परब, प्रकाश पवार, विकास गावडे, अनिकेत परब, उमेश परब आदी विध्यार्थी व पालक उपस्थित होते.

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या माध्यमातून मागील २० वर्ष अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. सण २२०३-३४ च्या दहावी बरावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांचा मंडळाच्यावतीने शालेय साहित्य व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच गावात प्रथम आलेल्या दहावी व बारावीतील विध्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना सागर गावडे पुरस्कृत आकर्षक पारितोषिक देखील देण्यात आले. तसेच मंडळाचे कार्य दर्शविणाऱ्या वह्यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात प्रशालेचे शिक्षक स्वप्नील सावंत यांनी मंडळाच्या कार्याचा गौरव करत मुलांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष लवू परब यांनी आपले सामाजिक काम असेच सुरु राहणार असल्याचे सांगत उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!