8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

विहिरीत पडलेल्या वन्यप्राणी “कोल्हा” ला कुडाळ वनपरिक्षेत्रच्या रेस्क्यू टिम कडून जीवदान

वेंगुर्ले :  तालुक्यातील आडारी भेंडमळा येथील श्री जयराम गावडे यांच्या मालकीच्या कोरड्या विहिरीत पडलेल्या वन्यप्राणी” कोल्हा”याला वन विभागाच्या कुडाळ वनपरिक्षेत्रच्या रेस्क्यू टिमने सुखरूप बाहेर काढले. यानंतर त्याची आरोग्य तपासणी करून त्याला वनअधिवासात सोडण्यात आले अशी माहिती कुडाळ वनक्षेत्रात श्री संदीप कुंभार यांनी दिली.

आडारी भेंडमळा येथील जयराम गावडे यांच्या कोरड्या विहिरीत एक कोल्हा पडला असल्याची माहिती वेंगुर्ला येथील वनाधिकारी यांना दूरध्वनी द्वारे मिळाली. त्यानंतर कुडाळ वनपरिक्षेत्र ची” रेस्कू टीम” घटनास्थळी पोहोचली. त्यानी स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले परंतु विहीर कोरडी असलेने व आकाराने १० फुटव्यासाची व अंदाजे ३० ते ४० फुट खोल आणि पूर्णतः जीर्ण झाली असलेने पडझड होऊन वन्यप्राणी जखमी होण्याची शक्यता दाट होती.

त्यामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. याठिकाणी कुडाळ वनक्षेत्रपाल श्री संदीप कुंभार, मठ येथील वनपाल श्री सावळा कांबळे, तुळस वनरक्षक श्री विष्णू नरळे, श्री राहुल मयेकर, वाहनचालक यांनी स्थानिक नागरिक श्री राधाकृष्ण पेडणेकर, श्री हेमंत आडारकर, श्री कौस्तुब गावडे, श्री वामन पेडणेकर, श्री रमेश नार्वेकर, श्री वसंत पेडणेकर, श्री बाबल गवंडे, अजित पेडणेकर यांच्या मदतीने व सुमारे दोन तासाच्या अथक परिश्रमा नंतर वन्यप्राणी कोल्हा सुखरूपपणे बाहेर काढले. तदनंतर पशुधन विकास अधिकारी वेंगुर्ला यांच्याकडून या कोल्ह्याची आरोग्य तपासणी केल्यावर त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
ही बचाव मोहीम सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री नवकिशोर रेड्डी, उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक डॉ. श्री. सुनील लाड, वनविभाग सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!