8.8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

चूकीच्या पध्दतीने सुरू असलेले पाईप लाईनचे काम वेंगुर्लेत रोखले

परवानगीशिवाय काम केल्याचा आरोप ; खोदाईच्या ठिकाणी डांबरीकरणांची मागणी

वेंगुर्ले : बांधकाम विभागाची परवानगी न घेता चुकीच्या पध्दतीने उभादांडा मानसीश्वर येथे सुरू असलेले पाईपलाईनचे काम ग्रामस्थांनी रोखले. रितसर परवानगी नसेल तर खोदकाम करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी पाईपलाईनचे काम अडविण्याचा आमचा हेतू नाही. परंतु ऐन पावसाळ्यात त्या ठिकाणी खोदकाम झाल्यानंतर डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण करून रस्ता योग्य पद्धतीने करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन घालण्याचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. याबाबत बांधकाम विभागाची परवानगी घेणे गरजेचे असताना कोणालाही न सांगता हे काम ठेकेदार कडून सुरू होते. त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल यांनी ग्रामस्थांच्या मदतीने हे काम रोखले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!