8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक परिषदेचे लाक्षणिक धरणे आंदोलन

सिंधूदुर्गनगरी | मयुर ठाकूर : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. आपल्या लाक्षणिक आंदोलनानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की रखडलेली विज्ञान विषयक शिक्षक पदून पदोन्नती प्रक्रिया राबविणे सिंधुदुर्ग सिंजपी/ शिक्षण / प्राथ/ आस्था- २/५१६४ या शिक्षण विभाग (प्राथमिक) च्या 13/2/2024 पत्रानुसार गणित व विज्ञान पदवी प्राप्त उपशिक्षकांना पदवीधर शिक्षक पदी पदोन्नती देण्यासाठी अंतिम सेवा जेष्ठता यादीतील उपशिक्षकाचा प्रस्ताव सादर करण्यात आले असून अद्याप त्यांना पदस्थापना देण्यात आली नाही ही रखडलेली प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया रखडलेली आहे ती ही राबविण्यात यावी इतर जिल्ह्यातील आंतर जिल्हा बदलीस प्राप्त उमेदवारांना त्या त्या जिल्हा परिषदेने कार्यमुक्त करण्यात आले आहे तरी आपल्या जिल्हा परिषदेनेही पात्र शिक्षकांना कार्यमुक्त करावे, आंतर जिल्हा बदलीने स्व जिल्ह्यात गेलेल्या शिक्षकांची पीएफ रक्कम अध्याप त्यांच्या खाती वर्ग करण्यात आलेली नाही ती लवकरात लवकर करण्यात यावी, वरिष्ठ वेतनश्रेणी रक्कम शिक्षकांच्या खाती वर्ग करणे. आदी मागण्या नमूद केल्या आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक, सुनील कारंडे, आनंद तांबे, रुपेश परब, निगोजी कोकितकर, रुपेशकुमार गुंजाळ, वल्लभांनद प्रभू, प्रणिता भोयर, सरिता परब आधी शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!