8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

आपली ओळख निर्माण करून देताना आई वडीलांच्या मेहनतीला सलाम करा

सिंधुदुर्ग| मयुर ठाकूर : जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या विविधांगी पायाभूत सुविधांच्या माध्यमातून कौशल्य गुण दाखवून प्रगती साधली पाहिजे. जगासमोर आपली ओळख निर्माण करून देताना आई वडीलांच्या मेहनतीला सलाम करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सतत कार्यरत रहा असे आवाहन माजी खासदार डॉ निलेश राणे यांनी केले.

सकल मराठा समाजाच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या महादेव भाटले स्कूल च्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी माजी खासदार डॉ निलेश राणे, माजी नगराध्यक्ष संजू परब, युवराज लखमराजे भोसले, भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष उद्योजक विशाल परब, सकल मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे, भोसले इंटरनॅशनल स्कूल चे उपप्राचार्य श्री गजानन भोसले, माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर,विलास जाधव, राघोजी सावंत , माजगाव सरपंच डॉ अर्चना सावंत आदी उपस्थित होते.

माजी खासदार डॉ निलेश राणे म्हणाले, मराठा समाजाची बाजू घेणे, आंदोलन करणं आणि समाजासाठी काम करत राहणं हे साधं नाही. अध्यक्ष सिताराम गावडे यांनी सतत कार्यरत राहून समजूतदार पणे भूमिका मांडत आहेत. नारायण राणे यांनी मराठा समाजाला प्रमाणात दिलं तेच आजही सुरू आहेत. नारायण राणे यांनी मराठा समाजाला एकत्र करून मराठा आरक्षणावर भूमिका मांडली दहा वर्षे उलटली.

डॉ निलेश राणे म्हणाले, मराठा समाज विद्यार्थ्यांना समाजासाठी लढणाऱ्या बाबतीत माहिती हवी. विद्यार्थ्यांना काय बनायचे तसं स्वातंत्र्य द्या. शिक्षणाची विविध दालने खुली झाली आहेत त्यामाध्यमातून कौशल्य दाखवा. जगाच्या स्पर्धेत विद्यार्थी उभा राहिला पाहिजे. आयुष्यात पैसा महत्वाचा आहे. पण तो उभा करण्यासाठी कौशल्य गुणांचा उपयोग केला पाहिजे. थोरामोठ्यांना वाचा आणि जीवनमूल्ये निर्माण करा. माझ्या आयुष्यात दोन वेळा पराभव झाला तरी डगमगलो नाही. तर ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या आई वडिलांची मेहनत फुकट घालवू देऊ नका. शेतकरी दुबार पेरणी घेतो तशीच विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे. माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या यशाचा गुणगौरव सोहळा आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांना आपल्या समाजाचा इतिहास माहीत पाहिजे. इतिहास अभ्यासतो तो जीवनात यशस्वी होतो.
युवराज लखमराजे भोसले म्हणाले, दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील काळात स्पर्धा परीक्षात सहभाग घेतील. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवून विविध क्षेत्रात विद्यार्थी चमकतील. शैक्षणिक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत.

भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब म्हणाले, विद्यार्थ्यांना यशाबद्दल शुभेच्छा देतानाच तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये सतत कार्यरत रहा.यावेळी पावणे दोनशे यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
माजगाव सरपंच सौ अर्चना सावंत, राघोजी सावंत, माजी नगरसेवक सुधीर आरिवडेकर, विलास जाधव,यशवंत आमोणकर, सुंदर स गावडे ,,सौ संयुक्ता गावडे ,तारकेश सावंत, साईश गावडे योगिता गावडे लवू लटम, सचिन सावंत,अमीत परब,अजय सावंत,जय भोसले,संजय लाड,दिगंबर नाईक,दिव्या बिरोडकर,प्रांजल बिरोडकर,सागर गावडे, प्रथमेश गावडे,साईश गावडे,दिव्येश बिरोडकर वैभव बिरोडकर विनोद सावंत,जयवंत घोगळे, आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक, स्वागत अध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले.सुत्रसंचलन जय भोसले यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!