5.4 C
New York
Wednesday, November 12, 2025

Buy now

उद्धव ठाकरेंचे ते बेस्ट सीएम पुरस्कार पैसे देऊन घेतले होते का ?

एक्झिटपोल वर टीका करणाऱ्या संजय राऊत ला भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा खडा सवाल

संजय राऊत ची पत्रकार परिषदेने इंडिया आघाडीत श्रद्धांजली सभा सुरू

भाजप चे ४०० पार खासदार निवडून येणार

मोदींना पंतप्रधान म्हणून जनतेने स्वीकारलं आहे

कणकवली | मयुर ठाकूर : एक्झिट पोलच्या आकड्यावर अपेक्षे प्रमाणे मोदींना पंतप्रधान म्हणून स्वीकारलं आहे.
तर महावीकास आघाडीला नाकारले आहे. विरोधकांनी पाकिस्तानच्या हिताचा प्रचार केला. तो प्रचार जनतेने नाकारला आहे. त्यामुळे ४०० पार भाजप म्हणून आम्ही करणार असा विश्वास भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

आता इंडिया आघाडी मध्ये श्रद्धांजली सभा सुरु झाली आहे. ह्याच उत्तर राऊत ची आजची पत्रकार परिषद पाहिल्या नंतर लक्षात येते.

एक्झिट पोल संजय राऊत ला मान्य नसेल तर बेस्ट सिएम चा पुरस्कार उद्भव ठाकरेंना द्यायचे त्या कंपन्या आता बंद झाल्यास की त्या ४२० होत्या. त्यावर राऊत असेच बोलणार का ? कालचे एक्झिट पोल खोटे असतील तर तुझ्या मालकाला मिळालेले ते पुरस्कार पैसे देऊन घेतले होते का असा खडा सवाल नितेश राणे यांनी केला. राऊत चा नियम वेगळा आहे. पवार ठाकरेंची खायची पोळी आणि काँग्रेस ची वाजवावी टाळी अशी याची वृती आहे अशी टीका ही या वेळी केली.

तुझा मालक आणि मालकीण भोंदू बाबांना घेऊन फिरतात. जेवणात मीठ खावू नका महणून सांगतात. काळी विद्या करा, सत्ता येईल अस तुझ्या मालकाला भोंदू बाबांनी सांगितल होत. ते भोंदू कसे चालतात. त्यामुळे स्वतःची लायकी ओळखून मोदी साहेबांवर टीका कर. आता तुझे जेलमध्ये जाण्याचे दिवस जवळ आले आहेत. आईला मिठी मारून रडण्याचे आणि जेलच्या भिंतीवर अग्रलेख लिहिण्याचे दिवस आले आहेत. भांडूप मधून निघण्याची वेळ आली आहे. अशी टीका आमदार राणे यांनी केली.
राणेंचा एक्झिट पोल सांगण्यापूर्वीच आम्हाला विजयाची खात्री आहे. विनायक राऊत नावाची भाकरी आता करपलेली आहे आणि ती परतायची आहे. हे जनतेने ठेवले आहे. त्यामुळे ४ जून रोजी ते दिसेल. आणि भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुद्धा दिसेल असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!