CEIR पोर्टल द्वारे ५० गहाळ मोबाईल केले हस्तगत
कणकवली : कणकवली पोलीस ठाणे अधिक गेले काही दिवसात घायाळ झालेल्या मोबाईलचे मोबाईलचा शोध लावत नागरिकांना दिलासा देण्यात आला तब्बल पन्नास मोबाईल आतापर्यंत गाजलेले शोधून पुन्हा नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आले.CEIR पोर्टल द्वारे ५० गहाळ मोबाईल हस्तगत करीत पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कासले यांची दमदार कामगिरी बजावली आहे.
ज्या नागरिकांचा मोबाईल गहाळ झाले होते,त्यांना पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांचे हस्ते मोबाईल परतकरणेत आले.यावेळी धर्मेंद्र चौहान, प्रदीप गांवकर, बसव्वा वडर, दिपक पाताडे, देवेंद्र तिर्लोटकर, विकास बिशनोई, संदेश राणे उपस्थित होते.
हे गहाळ मोबाईल बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक व महाराष्ट्र च्या विविध भागातून हस्तगत करण्यात आले.
पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कासले यांचा पोलीस अधीक्षक यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव झाला होता. पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कासले यांनी आज पर्यंत सुमारे सात लाख पन्नास हजार किमतीचे ५० मोबाईल तक्रारदारांना परत केले. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
यासाठी पोलीस निरीक्षक समशेर तडवी,सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांचे मार्गदर्शन लाभले.
या वितरण कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक समशेर तडवी, सहा.पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण,पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कासले ,मंगेश बावदाने उपस्थित होते.