0.3 C
New York
Monday, February 23, 2026

Buy now

माऊली मित्रमंडळच्या वतीने दहावीच्या विद्यार्थीनीचे अभिनंदन

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली, काल दिनांक २७/०५/२०२४ रोजी कणकवली शहरातील दहावी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवून पास झालेल्या सेंट ऊर्सुला स्कूल ची विद्यार्थिनी खुशी किशोर चव्हाण हि ९० टक्के गुण मिळवून पास झाली, याबद्दल माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर, संजय मालंडकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

तसेच कणकवली शहरातील टेंबवाडी येथील रहिवासी संजय राणे यांची कन्या कुमारी सुकन्या संजय राणे हिला ९७ टक्के गुण मिळवून पास झाले बद्दल पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले यावेळी माऊली मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर शालेय मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते, श्री व सौ किशोर चव्हाण,श्री व सौ संजय राणे , सुनिल काणेकर, भाई काणेकर, सुभाष उबाळे, बापू चव्हाण, विवेक मुंज, पंकज पेडणेकर, आदि उपस्थित होते,. उपस्थित सर्वांनी अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!