कलमठ येथील घटना : दुचाकीस्वाराची पादचारी महिलेला धडक
कणकवली : आचरा रस्त्यावरून कणकवलीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीची पादचारी महिलेला धडक बसली. त्यामुळे दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने तोही खाली पडला. यात पादचारी महिला यमुना भिकाजी मोरे (रा. कलमठ बाजारपेठ) या गंभीर जखमी झाल्या. तसेच दुचाकीस्वार मशाक इब्राहिम शेख (२८ रा. बांधकरवाडी) हा जखमी झाला.
या अपघात प्रकरणी आशुतोष भास्कर ठाकूर (४९, रा. कलमठ, लांजेवाडी) यांच्या तक्रारीवरून दुचाकीस्वार मशाक शेख याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात रविवारी रात्री कणकवली पोलिस ठाण्यानजीक आचरा रस्त्यावर झाला. आशुतोष ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, मी माझ्या घरातून बाहेर पडून कणकवली रेल्वे स्टेशनकडे जात होतो. पोलिस ठाण्यानजीक आलो असता मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने रस्त्यावरून चालणाऱ्या यमुना मोरे यांना धडक दिली. त्यामुळे यमुना मोरे यांच्या डाव्या पायाला गंभीर तर तोंडाला व हाताला किरकोळ दुखापत तर दुचाकीस्वार मशाक शेख किरकोळ जखमी झाला.