3.7 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

जानवलीत धडक देऊन पळालेली कारचालक गाडीसह पोलिसांच्या ताब्यात

या कारच्या धडकेत जाणवली अनिल कदम यांचा झाला होता मृत्यू

कणकवली पोलीसांचे पथक होते या कार चालकाच्या मागावर

पुणे निगडी येथून कार चालका सह कार घेतली ताब्यात

कणकवली : जानवली मध्ये महामार्गावर अनिल कदम यांना धडक देऊन पसार झालेली कार अखेर कणकवली पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतली आहे. कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे व त्यांचे पथक या कार व कारचालकाच्या शोधात होते. या पथकामार्फत शोध मोहीम सुरू असताना पुणे निगडी येथे ही कार सापडली व संशयित आरोपी ही त्याच भागातून ताब्यात घेण्यात आला. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. जाणवली येथील अनिल कदम यांना या कार ने धडक देऊन त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर दुसऱ्या दिवशीच जानवली ग्रामस्थांनी रास्ता रोको करत पोलिसांच्या कार्यक्षमते बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र पोलिसांनी संबंधित कार चा शोध सुरू असून पोलीस लवकरच कारचालकासहित कार ताब्यात घेतील अशी ग्वाही दिली होती. मात्र आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी तब्बल दीड तासाहून अधिक काळ रास्ता रोको करून आपल्या मागण्या लावून धरल्या. अखेर तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मध्यस्थीने या यात मार्ग निघाला होता. त्यानंतर कणकवली पोलिसांचे पथक या कारच्या मागावर होते. पुणे येथे ही कार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच कणकवली पोलिसांचे पथक पुण्याला जात त्यांनी तेथेच असलेल्या कारचालका सहित कार ताब्यात घेतली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!