8.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

पेट्रोलपंपावर शून्य सेट करूनच पेट्रोल भरावे

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे वाहनचालकांना आवाहन

वैभववाडी : वाहनात पेट्रोल, डिझेल भरताना पंपावर शून्य सेट करूनच पेट्रोल भरावे, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने करण्यात आहे. पेट्रोलपंपावर पेट्रोल, डिझेल कमी देण्यात येते अशा तक्रारी संस्थेकडे आल्या आहेत. याबाबत वाहनधारक ग्राहकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. देशात काही दिवसांपूर्वी पेट्रोलपंपांची तपासणी झाली, त्यात पेट्रोल, डिझेल कमी देत असल्याचे निदर्शनास आले होते. दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनात पेट्रोल, डिझेल भरताना शून्य सेट करून घेणे, त्यानंतर पेट्रोल भरण्यास सांगणे गरजेचे आहे.

मागील ग्राहकांचे पेट्रोल टाकलेले नोझल जर दुसऱ्या वाहनात टाकले आणि मागील ग्राहकाला १०० रुपयांचे पेट्रोल टाकले आणि तुम्हाला २०० रुपयांचे पेट्रोल पाहिजे असेल तर त्यापुढील अंक आपल्याला देऊन १०० रुपयांचे आपले थेट नुकसान होईल. तसेच आपली फसवणूक टाळण्यासाठी पेट्रोल, डिझेल लिटरमध्ये भरणे गरजेचे आहे. परंतु बऱ्याचदा तसे न करता शंभर, दोनशे, पाचशे, हजार रुपयांचे तेल भरतात. तरीही शून्य सेट करणे गरजेचे आहे. पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकण्यास सांगून आपण पैसे पाहत असतो आणि आपले लक्ष नसते, तेव्हाच आपली फसवणूक होऊ शकते. ग्राहकांनी पैसे पहिलेच काढून ठेवावे किंवा पेट्रोल भरल्यानंतर पैसे दिले पाहिजे. प्रत्येक पेट्रोलपंपावर पेट्रोल तपासणी यंत्र, मोजमाप असते, शंका वाटल्यास तपासणीची मागणी करावी. ज्या पेट्रोलपंपावर जुन्या मशीन असेल तिथे पेट्रोल भरणे टाळावे. काही पेट्रोल, डिझेल पंपावर चुकीच्या नोंदी सापडल्या. त्यानुसार अनेक पेट्रोलपंप बंद करण्यात आले. त्यांचे परवानेही रद्द करण्यात आले. काही पेट्रोलपंपांचे परवाने निलंबित करण्यात आले.

मात्र त्यानंतर केंद्र सरकार व पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व पेट्रोलपंपांवर ऑटोमॅटिक मशीन बसविल्या व त्यांना सॅटेलाइटच्या माध्यमातून जोडले गेले. त्यामुळे कोणत्या वाहनात किती पेट्रोल टाकले हे आपण कोठूनही ही तपासणी करू शकतो. त्यामुळे काटा मारण्याचा विषयच येत नाही. तरीही वाहनधारकांनी पेट्रोल, डिझेल पंपावर सतर्क राहावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र-सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने जिल्हाध्यक्ष एस.एन.पाटील, उपाध्यक्ष एकनाथ गावडे, संघटक सीताराम कुडतरकर व सचिव संदेश तुळसणकर यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!