21.4 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

डंपरची ट्रॅव्हलरला धडक : ९ प्रवासी जखमी

सावंतवाडी/ बांदा : मुंबई गोवा महामार्गावर बांदा स्मशानभूमी समोर वाहतूक कोंडीत अडकलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला डंपरने मागून धडक दिल्याने टेम्पो ट्रॅव्हलर समोर उभे असलेल्या आयशर टेम्पोला धडकली. यात टेम्पो ट्रॅव्हलर मधील ९ प्रवासी जखमी झालेत. अवकाळी पाऊस असल्याने अपघातानंतर तब्बल अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रवाशी गाडीतच होते. मात्र स्थानिकानी स्वतःच्या वाहनाने सर्व जखमींना बांदा प्राथमिक केंद्रात दाखल केले.

या अपघातात सिद्धीका प्रजय आढाव (१५), पलक प्रशांत आढाव (१४), प्रतिभा प्रकाश आढाव, स्वरा महेश पिळणकर (१४), समृद्धी प्रजय आढाव (१८), तेजल महेश पिरणकर (२३), हर्षदा महेश पिरणकर, प्रकाश लक्ष्मण आढाव, महेश मारुती आढाव (३५) याना दुखापत झाली. त्याच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आलेत.
————

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!