24.2 C
New York
Tuesday, March 31, 2026

Buy now

सावंतवाडी येथील श्री दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात ‘हनुमान जन्मोत्सव’ सोहळ्याचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल

सावंतवाडी : सावंतवाडी येथील उभाबाजार स्थित श्री दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘श्री हनुमान जन्मोत्सव’ सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. ३१ मार्च ते शनिवार, ४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, उभाबाजार हनुमान मित्रमंडळाने या सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे –

​गुरुवार, २ एप्रिल (मुख्य दिवस): सकाळी ८:०० वाजता मुख्य ‘श्री हनुमान जन्म व कीर्तन’ सोहळा संपन्न होईल. दुपारी ३:०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, रात्री ८:०० वाजता महाप्रसाद आणि ८:३० वाजता भजनाचा कार्यक्रम होईल. ​शनिवार, ४ एप्रिल: सोहळ्याची सांगता रात्री ८:०० वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत, चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांच्या ‘पतिव्रत्यतेज’ अर्थात ‘महिमा शिवचक्र तीर्थाचा’ या ट्रिकसिनयुक्त नाट्य कलाकृतीने होईल. ​उभाबाजार हनुमान मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी सर्व भाविकांना या सर्व कार्यक्रमांचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!