24.2 C
New York
Tuesday, March 31, 2026

Buy now

मसुरे येथील सिंधू आरोग्य मेळाव्यात 205 रुग्णांची तपासणी..

मसुरे : आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा आजचा हा सिंधू आरोग्य मेळावा अतिशय स्तुत्य असा उपक्रम असून अशा आरोग्य मेळाव्यातून खऱ्या अर्थाने रुग्णांची सेवा होते. असे आरोग्य मेळावे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत झाल्यास शासनाचा आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्याचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होईल. ग्रामस्थांनी आणि रुग्णांनी सुद्धा अशा मेळाव्यांचा लाभ घेऊन आपली आरोग्य विषयक समस्या दूर करावी असे प्रतिपादन मालवण पंचायत समितीच्या नूतन सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बोलताना केले.
आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे यांच्या वतीने सिंधू आरोग्य मेळावा मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नुकताच संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन मालवण सभापती सौ प्रज्ञा चव्हाण जि प सदस्य सौ शमा हडकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या आरोग्य मेळाव्यात 205 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी मसुरे जि प सदस्य क्षमा हडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी, पंचायत समिती सदस्या श्रीमती योजना कांबळी, श्री संजय ठाकूर, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधीर धनगे, विस्तार अधिकारी सूरज बांगर, मसुरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियांका पाटील, डॉक्टर सायली मिठारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी यांनी या आरोग्य मेळाव्या विषयी माहिती देऊन शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांचीही माहिती उपस्थित रुग्णांना देऊन शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी केले.
यावेळी बोलताना मसुरे जिल्हा परिषद सदस्य क्षमा हडकर म्हणाल्यात ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सुखकर आणि समृद्ध होण्यासाठी असे आरोग्य मिळावे होणे गरजेचे आहे. आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी अतिशय चांगला असा उपक्रम राबवला असून सर्व आरोग्य विभागाचे या निमित्ताने आभार व्यक्त करते.
कोळम पंचायत समितीच्या पंचायत समिती सदस्य सौ योजना कांबळी यावेळी बोलताना म्हणाल्यात असे आरोग्य मेळावे हे ग्रामस्थांना आणि रुग्णांना खऱ्या अर्थाने दिशादर्शक असतात. अशा मेळाव्यातून जे अति दुर्धर रुग्ण आढळतील त्यांनाही पुढील उपचार शासनाने मोफत करण्याच्या दृष्टीने योजना राबवावी.
यानंतर विविध मान्यवरांनी या आरोग्य मेळाव्यास शुभेच्छा दिल्यात.
सर्व रुग्णांची तपासणी डॉक्टर वसीम वल्लिकापट्टा, डॉक्टर ब्लेसी जोसेफ, डॉक्टर पूजा, डॉक्टर भावनेश चव्हाण, डॉक्टर अखिल बेगडे, डॉक्टर श्रीमती आर्या कदम, डॉक्टर कृष्णा त्यागी, डॉक्टर विना मेहंदळे, मसुरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सायली मिठारी, डॉक्टर प्रियांका पाटील यांनी केली. यामध्ये हृदयरोग, बालरोग, अस्थिरोग, शल्यचिकित्सक, नेत्ररोग, ईसीजी, वय वंदना, पी एम जे ए वाय कार्ड, एच एल एल टेस्ट, व्ही आय ए टेस्ट, एच पी व्ही लसीकरण, एन सी डी विभाग, जनरल फिजिशियन आधी विभागातील आरोग्यविषयक समस्या बाबत रुग्णांनी सहभाग नोंदवला. उपस्थित रुग्णांची तपासणी करून प्राथमिक स्वरूपातील औषधोपचारही पूर्णपणे मोफत करण्यात आले.
यावेळी विनोद पारकर, एस जे कदम, सिद्धेश धुरी, दत्ता पिंगुळकर, कृष्णा माजिक, डॉक्टर प्रशांत पवार, भक्ती परब अंजली नेरुळकर प्राची परब, ईस्टर मोहिते, क्रांती तोरस्कर, प्राची पेडणेकर, वसुधा कदम, दिव्या पांजरी, संगीता सामंत, वारीजा हडकर, संगीता मयेकर, सायली पाटील, सौम्या बांदेकर, प्रथमेश वायंगणकर, क्रांती पारकर, रामचंद्र जोशी, नितीन घाडी, राकेश चव्हाण, पल्लवी नाचणकर आणि मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज बांगर यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार श्री विनोद पारकर व शंकर कदम यांनी मानले. या सिंधू आरोग्य मेळाव्याचे आयोजन आणि नियोजन उत्कृष्ट केल्याबद्दल सर्व रुग्णांनी समाधान व्यक्त केले..

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!