7.5 C
New York
Thursday, March 26, 2026

Buy now

२४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कामगिरी

कणकवली : कणकवली पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) अंतर्गत दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.१८ मार्च रोजी सकाळी १०:३० ते दि. २० मार्च रोजी दुपारी ३:३० या कालावधीत ही घटना घडली होती.

या घटने प्रकरणी २४ मार्च रोजी रात्री ८:५९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. घरफोडी करून सुमारे १५,००० रुपये किमतीचे बाथरूममधील धातूचे नळ चोरीस गेल्याची तक्रार होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना CCTV फुटेज मिळाले होते. त्यावरून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. तपासात हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी शंकर नवलाप्पा पवार (वय ६८, रा. हिरज, ता. व जि. सोलापूर) याने केल्याचे निष्पन्न झाले.

२५ मार्च रोजी पोलिसांनी कणकवली पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचून आरोपी शंकर पवार याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी कणकवली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. सदर आरोपीने यापूर्वीही सिंधुदुर्गनगरी व कणकवली पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे केले असून, महिना भरापूर्वीच तो जामिनावर सुटला असल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, राजू जामसंडेकर व आशिष गंगावणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!