कणकवली : शहरातील सुतारवाडी येथे डीपी ट्रान्सफार्मर बसविणे तसेच रस्त्याच्या कामाबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिकांसमवेत चर्चा केली. अनेक महिन्यांपासून येथील नागरिकांकडून डीपी ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह जागेची पाहणी करून लाईनआउट करून घेतले.
यावेळी कन्हैया पारकर, तेजस राणे, परेश बागवे, सहदेव बागवे, बाळा बेळेकर, अक्षय मेस्त्री, कल्पेश मेस्त्री, सुशील आळवे, सतीश कांबळे, शंकर धुरी, नगरपंचायत कर्मचारी तसेच महावितरणचे अधिकारी श्री. स्वामी आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सुतारवाडी येथील उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल तसेच डीपी ट्रान्सफार्मर बसवून स्थानिकांची मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी नगराध्यक्ष झाल्यापासून विकास कामे, नागरिकांच्या मागण्या, आणि भेडसावणाऱ्या समस्या प्रामुख्याने लक्षात घेऊन तातडीने मार्गी लावल्या आहेत.