2.9 C
New York
Friday, March 6, 2026

Buy now

अंगणवाडी व लहान मुलांच्या विकासासाठी नगरपंचायत मदत करणार – नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली : अंगणवाडी व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतीकडून लागेल ती मदत करण्यात येईल. तसेच भविष्यात शहरात आणखी अंगणवाड्या वाढवण्यासाठी मागणीनुसार नगरपंचायत योग्य ती मदत करेल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बाल विकास विभाग तसेच अंगणवाडीच्या वतीने कणकवली येथे लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, जाई मुरकर, दीपिका जाधव, तेजस राणे, नगरसेविका मेगा गांगण, आरोग्य सहाय्य प्रशांत बुचडे, यांच्यासह कणकवली नगरपंचायतचे नगरसेवक, विद्यार्थी मुख्यअंगणवाडी सेविका, शहरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात अंगणवाडीतील चिमुकल्यांनी नृत्य, गाणी आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला दिनाचे औचित्य साधत लहान मुलांमधील कलागुणांना वाव देण्याचा तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!