8.1 C
New York
Thursday, February 26, 2026

Buy now

हरकुळ बुद्रुक येथील श्री देव कोटेश्वराचा आज अखंड हरीनाम सप्ताह

हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने दिंडी भजने व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली : हरकुळ बुद्रुक गावचे जागृत देवस्थान श्री देव कोटेश्वराचा अखंड हरीनाम सप्ताह आज दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे. प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षीही अखंड हरीनाम सप्ताह व शिमगोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. आज सकाळी १० वा घटस्थापना, सकाळी ११ ते ३:३० पाच वाडीतील भजने, दुपारी ३:३० हरिपाठ, सायं ७:३० वा. बुवा वैष्णवी सावंत यांचे भजन, रात्री ८ वा बुवा संतोष तांबे यांचे भजन, रात्री ८:३० वा श्री ब्राम्हणदेव सांस्कृतिक मंडळ आचरा यांचे दिंडी भजन, रात्री १०:३० वा श्री गणेश सेवा मंडळ, नांदगाव यांचे दिंडी भजन, रात्री १२:३० वा सद्गुरू दिंडी भजन कुडाळ यांचे दिंडी भजन, रात्री २:३० वा पहाटेची भजने, रात्री ४ ते सकाळी ८ पर्यंत पाच वाडीतील भजने, उद्या दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ९ बुवा अभिषेक शिरसाट यांचे सुस्वर भजन सकाळी ९ नंतर हरीनाम सप्ताहाची सांगता दुपारी १२ ते ३ पर्यंत महाप्रसाद अश्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमानी अखंड हरीनाम सप्ताह संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी हरीनाम सप्ताहास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हाहन श्री देव कोटेश्वराच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!