-0.3 C
New York
Tuesday, February 24, 2026

Buy now

कांबळे गल्लीतील गटार व्यवस्थेची नगराध्य संदेश पारकर यांच्याकडून पाहणी

कणकवली : कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रभाग क्रमांक ९ मधील कांबळे गल्ली परिसराचा दौरा करून तेथील गटार व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. परिसरातील सांडपाणी व्यवस्थेच्या समस्या लक्षात घेता लवकरच योग्य नियोजन करून गटार बांधकाम करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कांबळे गल्लीतील नागरिकांना विश्वासात घेऊनच गटार बांधणीचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले. नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणीदरम्यान कांबळे गल्लीवासीयांनी गटार बांधणीसंदर्भात निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, वैभव मालंडकर, शंशाक बोर्डवेकर, गणपत मालंडकर तसेच कांबळे गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!