3.4 C
New York
Thursday, February 19, 2026

Buy now

श्री देव महापुरुष मंदिर रौप्यमहोत्सव

१९ ते २२ फेब्रुवारी प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा

पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

मंडळाच्या कार्याचे कौतुक

कणकवली : शहरातील मुख्य बाजारपेठेतील प्रसिद्ध श्री देव महापुरुष मंदिर येथे रौप्यमहोत्सवानिमित्त दि. १९ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत श्री देव गणपती व श्री देव महापुरुष यांच्या नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. चार दिवस चालणाऱ्या या महाउत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
या उत्सवानिमित्त नामदार मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी सायंकाळी मंदिरास भेट देऊन श्रींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी महापुरुष मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष राजन पारकर, सचिव महेंद्र सांबरेकर, खजिनदार मंदार सापळे, माजी अध्यक्ष राजेश सापळे, अशोक करंबेळकर,राजू मानकर, प्रद्युम्न मुंज, साकेडीचे उपसरपंच प्रज्वल वर्दम, अमित सापळे, चेतन अंधारी, सोहम वाळके, राजा राजाध्यक्ष,सुशील पारकर, दत्ता तोरस्कर, स्नेहा अंधारी, सौ. सापळे, सौ. मुंज, हरीष उचले, संदीप अंधारी, रज्जी कंडियन आदी मान्यवर व भक्तगण उपस्थित होते.
कणकवली शहराला लाभलेली समृद्ध सांस्कृतिक परंपरा अधोरेखित करत पालकमंत्री राणे म्हणाले, “मुख्य बाजारपेठेत होत असलेला हा दिमाखदार आणि नावीन्यपूर्ण सोहळा शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा आहे.” मंडळाच्या नियोजनबद्ध कार्याचे कौतुक करत त्यांनी उत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!