3.3 C
New York
Thursday, February 19, 2026

Buy now

कणकवलीत विवाहित महिलेवर अत्याचार

फोटो व्हायरलची धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पोलीस कोठडी संपल्यावर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

कणकवली : विवाहित महिलेसोबत जबरदस्तीने फोटो काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात आरोपी मुबारक शहाबुद्दीन साटविलकर (वय ३०, रा. नांदगाव खालची मुस्लीमवाडी, ता. कणकवली) याला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, आरोपीने ओळखीचा फायदा घेत जबरदस्तीने तिचा फोटो काढला होता. तो फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मार्च २०२३ ते मे २०२५ या कालावधीत तालुक्यातील काही लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी ११ फेब्रुवारी रोजी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे यांनी १२ फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक केली.

आरोपीला न्यायालयात हजर करून अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने १७ फेब्रुवारीपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!