-0.1 C
New York
Friday, February 13, 2026

Buy now

शासकीय रुग्णालयांतील उपचार अगोदर सारखेच होणार मोफत

सिंधुदुर्ग : नागरिकांच्या हक्कांच्या शासकीय रुग्णालयातील शुल्कवाढीच्या तक्रारी, तसेच आंदोलनानंतर सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारी २०२५ पासून वाढवण्यात आलेले शुल्क अखेर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी व उपचार पुन्हा पूर्वीप्रमाणे निशुल्क असणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाने ९ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार रुग्णालयांमध्ये शुल्कवाढ करण्यात आली होती. मात्र, १ फेब्रुवारी २०२५ च्या सुधारीत आदेशानुसार ही शुल्कवाढ रद्द करण्यात आली आहे.

एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआयला शुल्क ?

आरोग्य विभागाच्या ९ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार एक्स-रेसाठी ३० रुपये, सीटी स्कॅनसाठी ५०० रुपये व एमआरआयसाठी १५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार होते.

काय होता निर्णय ?

प्राथमिक आरोग्य केंद्रे ते जिल्हा रुग्णालयांमध्ये सर्व तपासण्या व उपचारांसाठी शुल्क आकारले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार सर्वसामान्य रुग्णांसाठी १०० हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार, असेही नमूद करण्यात आले होते.

पहिली प्रसूती मोफत; पुढील प्रसूतीसाठी शुल्क ?

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परिपत्रकानुसार पहिली प्रसूती मोफत, दुसऱ्या प्रसूतीसाठी ५०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. तसेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार सर्वसामान्यांना उपचार मोफत करण्यात आले आहेत.

शासकीय रुग्णालयांत उपचार निशुल्क

नागरिकांच्या आंदोलनानंतर १ फेब्रुवारी २०२५ च्या सुधारीत आदेशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयांमधील सर्व तपासण्या व उपचार पूर्वीप्रमाणे निशुल्क राहणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी व उपचार निशुल्क करण्याबाबत आदेश आरोग्य विभागाच्या सचिवांनी १ फेब्रुवारी २०२५ च्या सुधारीत परिपत्रकात नमूद केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!