मनोज रावराणे ४९९९ मताधिक्याने विजयी
कणकवली | मयुर ठाकूर :
हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मनोज रावराणे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. झालेल्या मतमोजणीत मनोज रावराणे यांना एकूण ५८२८ मते मिळाली.
त्यांच्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार प्रमोद सांगवेकर यांना ८२९ मते मिळाली. तर या मतदारसंघात नोटाला १६९ मते पडली.
मनोज रावराणे यांनी ४९९९ मतांच्या भक्कम फरकाने विजय संपादन करत जिल्हा परिषद सदस्यपदावर आपले नाव कोरले आहे. या निकालामुळे हरकुळ बुद्रुक परिसरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विजयानंतर जल्लोष करण्यात आला.
विजयानंतर मनोज रावराणे यांनी मतदारांचे आभार मानत, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.