कणकवली : तालुक्यातील नाटळ जिल्हा परिषद मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उत्तम लोके यांनी आपला झंजावती प्रचार सुरू केला असून नाटळ गावामध्ये काढलेल्या प्रचार फेरी दरम्यान त्यांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या. दडपशाही विरोधात व मतदार संघाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे जनतेमध्ये मोठी चीड असून जनता निश्चितच या मतदारसंघातून मला मोठ्या मताधिक्याने विजयी करेल असा विश्वास मतदारांच्या गाठीभेटीनंतर उत्तम लोके यांनी व्यक्त केला. त्यांच्या या प्रचारफेरी दरम्यान शिवसेना शाखाप्रमुख काशिनाथ गावकर, विजय गावकर, नामदेव गावकर, प्रशांत कदम, प्रशांत गावकर शुभम गावकर श्रीराम गुरव सागर लोके भरत लोके सुरेश लोके राजन लोके अमित सावंत लव पवारे संदीप गावकर सिद्धेश गावकर प्रवीण गावकर विजय गावकर आबाजी गुरव रवी गुरव उमेश गावडे अजय आचरेकर परशुराम पवार दीपक पवार शेखर पवार सुभाष देवळीसीमा पवार मनीषा लोके सुरेखा लोके उर्वी लोके प्रीती प्रीती कदम विजया गावकर, अंकिता गावकर, आदी उपस्थित होते.