कणकवली : हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद सांगवेकर यांनी आज राष्ट्रवादीचे कणकवली तालुकाध्यक्ष व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी पक्षाचे फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार अनंत पिळणकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पिळणकर यांनी प्रमोद सांगवेकर यांनी पैशाला विकले न जाता ठामपणे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. तसेच त्या मतदारसंघातील लढाईला माझा पाठिंबा आहे असेही आश्वासन सांगवेकर यांना दिले. तसेच सत्ताधारी भाजपा व शिवसेनेला जनता असा कंटाळली असून जनता सर्वसामान्य उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभी राहील असा विश्वास असल्याचे देखील पिळणकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी निलेश राणे, रमेश राणे, उत्तम तेली, धकु गोठनंकर, ठाकरे शिवसेना तालुका अध्यक्ष माधवी दळवी, संजना कोलते आदी उपस्थित होते.