कणकवली नगरपंचायतीत अधिकारी, कर्मचारी, नगरसेवकांनी वाहिली श्रद्धांजली
कणकवली : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.
कणकवली नगरपंचायतीच्या सभागृहात आयोजित शोकसभेत अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष, नगरसेवक-नगरसेविका, मुख्याधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतीची नियोजित बैठक तहकूब करण्यात आली असून पुढील बैठकीची माहिती लवकरच देण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.