उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा
कणकवली : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांचा दुःखद मृत्यू झाला. वाईट आणि धक्कादायक घटनेनंतर कणकवली येथे आज 28 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे होणाऱ्या महायुतीची प्रचार सभा रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी ही प्रचार सभा रद्द करण्यात आली आहे. अजित दादा यांच्या सह सहा जणांचा या अपघातात बारामती येथे मृत्यू झाला आहे.त्यामुळे भाजप,सेना,राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे.


