0.4 C
New York
Friday, January 23, 2026

Buy now

पंचायत समिती निवडणुकीत ठाकरे गटाला कणकवली तालुक्यातून दुसरा धक्का

वरवडे पंचायत समितीत भाजपाचे सोनू सावंत बिनविरोध

ठाकरे गटाच्या सुधीर सावंत व मनसेचे शांताराम साद्ये यांची माघार

कणकवली : तालुक्यात बिनविरोध निवडीचा धमाका भाजपाकडून सातत्याने सुरू असून, बिडवाडी पंचायत समितीमध्ये एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर शुक्रवारी वरवडे पंचायत समितीमध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले सोनू सावंत यांच्या विरोधातील शिवसेना ठाकरे गटाचे सुधीर सावंत व मनसेचे शांताराम सादये या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शुक्रवारी कणकवली तालुक्यातील भाजपचे दुसरे पंचायत समिती मधील उमेदवार सोनू सावंत हे बिनविरोध झाले आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा निवडणूक विभागाकडून करण्यात आली नाहीय. मात्र वरवडे पंचायत समितीमध्ये तीन उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ठाकरे गटाचे सुधीर सावंत व मनसेचे शांताराम सादये यांनी अर्ज माघार घेतल्याने सोनू सावंत यांचा एकमेव अर्ज राहीला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर होणार आहे. भाजपने हा ठाकरे गटाला दुसरा धक्का दिला आहे.

आतापर्यंत भाजपाचे कणकवली मतदार संघांमध्ये तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. यामध्ये बिडवाडी पंचायत समिती, दुसरी वरवडे पंचायत समिती तर वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे पंचायत समिती ची जागा भाजपला बिनविरोध झाल्या आहेत.

बॉक्स :

कणकवलीतून ४ जणांची माघार

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारांपैकी शुक्रवारी ४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. फोंडाघाट जि. प. मतदारसंघातून शिंदे शिवसेनेच्या उमेदवार सुजाता हळदिवे, तर खारेपाटण जि. प. मतदार संघातून अपक्ष उमेदवार उज्ज्वला चिके यांनी तसेच वरवडे पंचायत समितीच्या मतदार संघातून ठाकरे शिवसेनेचे सुधीर सावंत व मनसेचे उमेदवार शांताराम सादये यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या २२ जागांसाठी ८७ जण उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीची २७ जानेवारी अंतिम तारीख असून त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!