7 C
New York
Thursday, January 22, 2026

Buy now

समान मत, समान किंमत!’

शहर-ग्रामीण मतदारांवर अन्याय नको — बॅनरने उठवला सवाल

कणकवली :
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहराच्या प्रवेशद्वारावर हळवल फाटा येथे झळकलेला एक बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘समान मत, समान किंमत!’ अशा आशयाचा हा बॅनर निवडणूक प्रक्रियेत पैशाच्या वापरावर थेट भाष्य करणारा ठरला आहे.

बॅनरमध्ये शहरातील मतदारांना १५ हजार रुपये देण्यात येत असल्याचे उल्लेख असून, ग्रामीण भागातील मतदारांवर होणाऱ्या कथित अन्यायावर रोखठोक सवाल उपस्थित केला आहे. ग्रामीण मतदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागरिकांनी या भेदभावाविरोधात आपली नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, शहर आणि ग्रामीण भागातील मतदारांमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्व मतदारांना समान वागणूक द्यावी.

सध्या निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना, अशा प्रकारचे बॅनर झळकणे राजकीय वर्तुळात तसेच सामान्य मतदारांमध्येही चर्चेचा विषय बनले आहे. या बॅनरने पैशाच्या वापरासंदर्भातील नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचे आवाहन केले आहे. कणकवली प्रशासनाने अद्याप या बॅनरवर काही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!