महायुतीकडून अर्ज दाखल ; काही ठिकाणी बंडखोरी
दोडामार्ग : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी दोडामार्ग तालुक्यात अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या 3 जागांसाठी २१ अर्ज तर पंचायत समितीच्या ६ जागांसाठी ३६ अर्ज दाखल झाले आहेत. माटणे जिल्हा परिषद मधून सर्वाधिक १२ अर्ज दाखल झाले आहेत. पंचायत समिती मणेरी मतदार संघातून १०अर्ज दाखल झाले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी दिली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली. पहिल्या चार दिवसांत शांतता असलेल्या तहसील कार्यालयात बुधवारी उमेदवारांची आणि समर्थकांची मोठी झुंबड उडाली. जिल्हा परिषदेच्या ३ गटांसाठी २१, तर पंचायत समितीच्या ६ गणांसाठी ३६ उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत
माटणे गटात १२ अर्ज दाखल झाले असून या मतदार संघाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या माटणे जिल्हा परिषद गटात सर्वाधिक १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. येथे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंच्या दिग्गज नेत्यांनी अर्ज भरल्याने रंगत वाढणार आहे. या मतदार संघात शिवसेना भाजपा अधिकृत युतीचे उमेदवार म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनीही अर्ज दाखल केला आहे त्याच बरोबर सर्व युतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत
यात भाजपा पाच उमेदवार तर शिंदे सेनेच्या वतीने चार जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे तर काही ठिकाणी बंडखोरी करण्यात आली आहे
महायुती (भाजप-शिंदे शिवसेना) शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी युतीधर्म पाळून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. तर भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी महायुतीचा फॉर्म्युला ठरला असून नाराज नेत्यांची समजूत वरिष्ठ काढतील, असा विश्वास व्यक्त केला.
सकाळ पासून युतीच्या कार्यकर्ते पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.