कुडाळ : काल महायुतीचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. काल भाजपच्या ओरोस मंडल अध्यक्षांसह भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा होता. आज त्याची पुनरावृत्ती झाली असून वर्षाताई कुडाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
वर्षा कुडाळकर यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले असून सध्या शिवसेना व्हे. जे. एन. टी. महिला जिल्हाप्रमुखपदी त्या कार्यरत आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेसह महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे.