1.7 C
New York
Saturday, January 17, 2026

Buy now

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या ‘आरंभ प्रदर्शन–२०२६’चा भव्य शुभारंभ

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन

कणकवली | मयुर ठाकूर : फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या वतीने आयोजित ‘आरंभ प्रदर्शन–२०२६’ या प्रदर्शनाचा शुभारंभ कणकवली नगरपालिकेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या शुभहस्ते फीत कापून उत्साहात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष, राष्ट्रवादीचे अनंत पिळणकर, निवेदक निलेश पवार, फ्लोरेट कॉलेजच्या संचालिका आस्था कदम, कदम सर, आर्या बिडये यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक व अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या वतीने नगराध्यक्ष संदेश पारकर तसेच उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी प्रदर्शनाची सविस्तर पाहणी केली.

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेल्या लहान मुलांसाठी किड्स बेडरूमची संकल्पना, निसर्गाच्या सानिध्यातील कॅफे डिझाईन, हॅन्डमेड नेकलेस, तसेच विविध प्रकारच्या कलात्मक व नाविन्यपूर्ण डिझाईन व कलाकृती सादर केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या सर्जनशील कलाकृतींनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कणकवलीत अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण व सर्जनशील उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांमधील नव्या कल्पना, सर्जनशीलता आणि कौशल्यांना दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग करत आहे. येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृती खरोखरच कौतुकास्पद असून भविष्यात हे विद्यार्थी डिझायनिंग क्षेत्रात नक्कीच उज्ज्वल यश मिळवतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच फ्लोरेट कॉलेजच्या माध्यमातून दर्जेदार व सर्जनशील विद्यार्थी घडावेत, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

या प्रदर्शनास नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. ‘आरंभ प्रदर्शन–२०२६’ हे प्रदर्शन कणकवलीतील कला व डिझायनिंग क्षेत्राला नवी दिशा देणारे ठरत असल्याचे यावेळी उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!