कणकवली : समीर केतकर स्मरणार्थ टेम्बवाडी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कणकवली शहरातील युवा नेतृत्व वैभव मालंडकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी शिवशंकर पारगावकर, शुभम चव्हाण, दुर्वांक मालंडकर, रोहित मसुरकर, रोहित जाधव, किरण सावंत, सोमनाथ पारगावकर, निखिल बागवे, विजय सारंगले, सुहास सूर्यवंशी, भावेश राजपूत, पप्पू पेंदडूरकर, साई परब, विक्रांत सावंत, अथर्व यादव, रवी अंबारे, विशाल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वैभव मालंडकर, निलेश पवार, आदित्य सापळे, प्रथमेश परब, प्रकाश केतकर, अभय राणे, नयन यादव, नयन सुतार, आतिश कांदळकर यांनी उपस्थिती लावली.
टेम्बवाडी मित्रमंडळाच्या या उपक्रमामुळे परिसरातील युवकांना क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून, या स्पर्धेमुळे क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.