कणकवली : कणकवली तालुका संजय गांधी योजना समितीची बैठक अध्यक्ष शरद कर्ले यांच्या उपस्थितीत पार पडली. या पहिल्याच बैठकीत संजय गांधी निराधार योजना ३४, श्रावणबाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजना १३, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना ४ अशी मिळून ५१ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली.
पालकमंत्री नितेश राणे यांनी शिफारस केल्यानुसार कणकवली तालुका संजय गांधी योजना समिती गठीत झाली आहे. संजय गांधी योजना समितीची पहिली सभा दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी तहसीलदार कार्यालय कणकवली येथे घेण्यात आली. या सभेला संजय गांधी कणकवली समिती अध्यक्ष शरद कर्ले, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी कणकवली अरुण चव्हाण, मुख्याधिकारी कणकवली गौरी पाटील, संगांयो समिती सदस्य गौतम खुडकर, सुजाता हळदिवे, विजय भोगटे, विजय कातरुड, भगवान दळवी, दीपक दळवी, गुरुनाथ वर्देकर, गजानन शिंदे, नायब तहसीलदार जी. एम. कोकरे व संजय गांधी योजना शाखा कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित समिती अध्यक्ष शरद कर्ले यांना तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.