सावंतवाडी : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला “हॅपी न्यू इयर” असे येणारे कोणतेही “एपीके फाईल”चे संदेश मोबाईल धारकांनी डाऊनलोड करू नये. ते फसवणुकीचे प्रकार, असू शकतात. तुमच्या खात्यातील तशीच वैयक्तिक बँकेची माहिती अज्ञातापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे खबरदारी घ्या, असे आवाहन सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी केले आहे. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर काही सायबर हॅकरांकडून अशा प्रकारचे मेसेज पाठवले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलिसांच्या माध्यमातून हे आवाहन करण्यात आले आहे.