माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्या कार्यालयात भाजपच्या नेत्यांचे फोटो आणि पक्षाच चिन्ह हटविले
समीर नलावडे काही तासांतच भाजपच्या लोकांवर कृतघ्न झाले
कन्हैया पारकर यांचा सणसणीत टोला
कणकवली : काल माजी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले कणकवली नगरपंचायत मधील नगराध्यक्ष दलनातील खास. नारायण राणे यांचे फोटो काढले गेले. आम्ही राणेंच्या विचाराधारेपासून बाजूला झालो होतो. नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर यांनी जेव्हा प्रवेश केला त्यावेळी तिथे कोणतेही फोटो नव्हते, अशी माहिती मिळाली आहे. प्राशसन यावर लवकरच भूमिका मांडणार आहे.
खा. राणे साहेबांचा फोटो काढण्याचा प्रचार केला जात आहे तो चुकीचा आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमधून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. काल त्यांनी जनसंपर्क कार्यालय काढलं. मात्र त्यावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांचे फोटो हटवले, भाजपचे चिन्ह देखील हटवले आहे. काही दिवसांत किंवा तासांतच ते भाजपच्या लोकांवर कृतघ्न झाले आहे. ही निवडणूक सर्व पक्षाच्या लोकांच्या सहभाग आणि योगदानाने झालेली आहे. भाजप विरोधी ही निवडणूक लढवली गेली. शहराच लोकप्रतिनिधीत्व करतात खा. नारायण राणे करत आहेत. ही निवडणूक शहर विकास आघाडी म्हणून लढवली गेली. असंख्य लोकांनी ही निवडणूक लढवली. खासदार नारायण राणे यांची हरकत नसेल तर त्यांचे फोटो लावणं वावगं ठरणार नाही.