कणकवली : जनतेच्या मनातील राजा माणूस आणि हक्काचा माणूस म्हणून संदेश पारकर यांच्याकडे पाहिले जाते. आज ओसरगाव येथे याची प्रचिती आली. संदेश पारकर हे अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. अखेर कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून संदेश पारकर हे निवडून आले आणि जनतेच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. कणकवलीत आनंदोत्सव सुरू झाला. आमचो भाई …निवडान इलो …. भाई आमचो नगराध्यक्ष झालो. हा आनंद प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर अजून देखील दिसत आहे.
संदेश पारकर आज आपल्या काही कामानिमित्त ओरोसच्या दिशेने चालले होते. यावेळी ओसरगाव येथे त्यांची गाडी थांबवली गेली. गाडी थांबवणारी ही ‘आमचो संदेश भाई” म्हणणारी जनताच होती. पदाचा कोणताही स्वार्थ न ठेवता संदेश पारकर यांनी आपली गाडी थांबवली आणि खाली उतरले.
यावेळी संदेश पारकर नगराध्यक्ष झाले याच पार्श्वभूमीवर ओसरगाव येथील काही नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी थांबले होते. यावेळी ओसरगाव चे ग्रामस्थ नागेश चव्हाण यांच्या परिवाराने तसेच बोर्डवे ग्रामस्थांनी संदेश पारकर साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माही उपसरपंच बबली राणे देखील उपस्थित होते.