1.7 C
New York
Thursday, December 25, 2025

Buy now

विरोधकांनी उपनगराध्यक्ष व सभापती पदाची स्वप्ने पाहू नये

सुजित जाधव यांचा विरोधकांना टोला

कणकवली : कणकवली नगरपंचायत मध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि 8 नगरसेवक तर विरोधी पक्ष भाजपाचे एकूण 9 नगरसेवक निवडून आले आहेत. 9 नगरसेवक असल्यामुळे विरोधक उपगराध्यक्ष आणि सभापती पदाची दिवास्वप्न पाहत आहेत. मात्र महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 च्या कलम 13 (1) नुसार, सभागृहातील कोणत्याही विषयावर मते समान (Tie) झाल्यास सभेच्या अध्यक्षास (नगराध्यक्षास) निर्णायक / Casting Vote देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार कणकवली नगरपंचायत मध्ये सुदधा नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर याना दोन मतांचा विशेषाधिकार असून त्यानुसार कणकवली नगरपंचायत मध्ये उपनगराध्यक्ष आणि सर्व समिती सभापती सुद्धा शहर विकास आघाडीचेच निवडून येणार. त्यामुळे विरोधकांनी तशी स्वप्ने पाहू नयेत असा टोला सुजित जाधव यांनी लगावला आहे. कणकवली नगरपंचायत मध्ये नगराध्यक्षाचे मत सोडून शहर विकास आघाडीकडे 8 आणि विरोधी भाजपाकडे 9 मते आहेत. कायद्यानुसार नगराध्यक्ष हा सभागृहाचा सदस्य असल्याने त्याला सामान्य मतदानाचा पूर्ण अधिकार आहे.

नगराध्यक्षाने आपल्या गटाला मत दिल्यास मतसंख्या ९:९ अशी समान होते. अशा परिस्थितीत कलम 13(1) लागू होऊन नगराध्यक्षास निर्णायक मत देण्याचा अधिकार आपोआप लागू होतो.

हा अधिकार नवीन नाही, रद्द केलेला नाही आणि आजही कायद्यानुसार वैध आहे. म्हणून उपनगराध्यक्ष निवड प्रक्रिया नगराध्यक्षाच्या सामान्य व निर्णायक मतासह पूर्ण करणे कायदेशीर व बंधनकारक आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष व सर्व सभापती हे कणकवली शहर विकास आघाडीचेच निवडून येणार असे सुजित जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकातून म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!