1.7 C
New York
Thursday, December 25, 2025

Buy now

आशिये गांगो भैरी देवालयाचा २८ रोजी वार्षिक जत्रोत्सव

कणकवली : कणकवली तालुक्यातील आशिये गावचे ग्रामदैवत श्री देव गांगो भैरी देवालयाचा वार्षिक जत्रोत्सव २८ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी नित्यपुजा, अभिषेक,ओट्या भरणे तसेच आंब्रड येथील ढोलपथकाचा ढोल वाद्यांचा कार्यक्रम होणार आहे. रात्रौ ठिक ८ वाजता आनंद बाणे यांचा भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम त्यानंतर स्थानिक भजने तसेच रात्री १० वाजता सुप्रसिद्ध बुवा अरुण घाडी यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. रात्रौ १२ वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळ ओसरगाव यांचा महान पौराणिक नाट्य प्रयोग सादर होणार आहे.
तरी भाविकांनी देवदर्शनाचा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव गांगो भैरी देवस्थान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!