पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एकत्रित १४ घरे उभारणारी पहिली ग्रामपंचायत
लवकरच लाभार्थ्यांना सोयीसुविधांनी युक्त घरे देण्याचा प्रयत्न – सरपंच संदीप मेस्त्री
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एकत्रित १४ घरे उभारणारली जात आहे. १५ गुंठ्याच्या क्षेत्रावर एकत्रित पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १४ घरे उभारणारी ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. या पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचा १४ ही लाभार्थ्यांना लवकरात लवकर सोयीसुविधांनी युक्त घरे देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिली.
कलमठ ग्रामपंचायतमध्ये बेघर लाभार्थ्यांना एकत्रित करत भूमिहिन असलेल्या या लाभार्थ्यांना घर देण्याचे स्वप्न होतेय. त्यानुसार लाभार्थी गोळा करुन त्यांचे भूमिहीन दाखले सर्वप्रथम काढण्यात आले. त्यानंतर अल्प दरात जमीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर कलमठ कुंभारवाडी येथे १५ गुंठ्यांचा भूखंड लाभार्थ्यांच्या नावे खरेदी करण्यात आला. या भूखंडावर १४ लाभार्थ्यांना हक्काचे घर व १ गुंठा जमीन प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे. नुकताच घरांचा बांधकामाचा शुभारंभ झाला होता. आता ही घरे एका
विकासकामार्फत गतिमान पध्दतीने विकसित केली जात आहेत. १३ घरांच्या संकुलाचे उद्घाटन सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कलमठ गावातील बेघर यादीतील लाभार्थ्यांना एकत्रित १३ घरांचे बांधकाम करून संकुल तयार करण्यात येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. गावातील बेघर कुटुंबांना जमिन स्वतःच्या मालकीची नसल्याने घर बांधण्याची अडचण निर्माण होती. सध्या या घरांची कामे प्रगतीपथावर असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले.