3.3 C
New York
Wednesday, December 24, 2025

Buy now

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कणकवली बॅनरवॉर

कणकवली : शहरात आता बॅनर वॉर रंगू लागले असून कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीच्या अनुषंगाने काल दुपारी नाईक हितचिंतकांकडून उपरोधी टीका करणाऱ्या बॅनरला सावंत – नलावडे समर्थकांनी जोरदार बॅनर द्वारे शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले.

कणकवली शहरात फ्लाय ओव्हर ब्रिज खाली दोन ठिकाणी नलावडे – सावंत हितचिंतकांकडून हे बॅनर लागले असून कणकवलीत श्रीधर नाईक चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक या दोन ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले. यातील एका बॅनर मध्ये “भावाच्या गोट्या काढणाऱ्यांच्या पाठिंब्यावर उभे राहून स्वतःच्या गोट्या वाचवणाऱ्यांनी बोलूच नये” #सावंत नलावडे हितचिंतक. तर दुसऱ्या बॅनर वर “वांझोटेच्या बाळंतपणाला समर्थकांचा लागला” टेस्ट ट्यूब बेबी. #सावंत नलावडे हितचिंतक अशा दोन आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. याबॅनरमुळे नाईक हितचिंतकांकडून लावलेल्या बॅनरला अगदी शेलक्या शब्दात काही तासांमध्येच प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सावंत – नलावडे समर्थकांकडून या बॅनरद्वारे दिलेल्या शेलक्या शब्दातील प्रत्युत्तरामुळे येत्या काळात कणकवलीत अशाच प्रकारे वार पलटवार होणार असल्याचे संकेत या बॅनरवॉर च्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

काल रात्रीपासूनच कणकवली शहरात या बॅनरची चर्चा सुरू आहे. दरम्यान काल दुपारी नाईक हितचिंतकांनी लावलेला बॅनर काही वेळानंतर पोलिसांच्या सूचनेनंतर नगरपंचायतने हटवला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!