कणकवली : कणकवली पेन्शनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
या सभेत निवृत्तीवेतनाबाबत तज्ञांकडून विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ज्या निवृत्त वेतनधारकांच्या पेन्शन संबंधी काही वैयक्तिक तक्रारी असतील किंवा शासनाकडून मिळणारे काही लाभ प्रलंबित असतील, तर अशा सभासदांनी आपल्या तक्रारी किंवा मागणीचे पत्र लेखी स्वरूपात संघाकडे द्यावे. तसेच तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त धारकांनी या सभेला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली पेन्शनर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.