2.4 C
New York
Tuesday, December 23, 2025

Buy now

संदेश पारकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

कणकवली : राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणूकीत भाजपाचे उमेदवार समीर नलावडेंना पराभूत करून विजयी झालेले शहर विकास आघाडीचे उमेदवार तथा कणकवली नगरपंचायतचे नूतन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, शहर विकास आघाडीचे जनक असलेले माजी आमदार राजन तेली, प्रथमेश तेली आदी उपस्थित होते.

कणकवली नगरपंचायत निवडणूकीत शिंदे शिवसेनेचे स्टार प्रचारक आमदार निलेश राणे यांनी संदेश पारकर यांना जाहीर पाठिंबा देत पारकर यांच्या विजयासाठी भाजपा विरोधात शड्डू ठोकला होता. अखेर राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष निवडीत भाजपाचे उमेदवार समीर नलावडे यांचा 145 मतांनी पराभव करून आमदार निलेश राणेंचा पाठिंबा असलेले शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे कणकवलीच्या नगराध्यक्षपदी निवडून आले होते. संदेश पारकर यांच्या विजयाचे किंगमेकर हे खऱ्या अर्थाने आमदार निलेश राणे ठरले होते. या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर नूतन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज रात्री उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या सदिच्छा भेटीनंतर संदेश पारकर हे शिवसेना उबाठा पक्षात राहणार की शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार ही देखील चर्चा कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झाली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!