-3.8 C
New York
Tuesday, February 10, 2026

Buy now

धुरळा.! कणकवली नगरपंचायत निवडणुकीत संदेश पारकर विजयी…

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहर विकास आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून, आघाडीचे प्रमुख उमेदवार संदेश पारकर यांनी नगराध्यक्षपदी शानदार विजय संपादन केला आहे. अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत पारकर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत कणकवलीच्या नगराध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा आपल्या हाती घेतली आहे.

निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कणकवली शहरात शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाच्या उधळणीने संपूर्ण शहर न्हाऊन निघाले होते. या निवडणुकीत प्रामुख्याने शहराचा विकास, नागरी सुविधा आणि प्रलंबित प्रश्न हे मुद्दे केंद्रस्थानी होते. संदेश पारकर यांनी प्रचारादरम्यान मांडलेली विकासाची भूमिका मतदारांना भावल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

विजयानंतर पत्रकारांशी बोलताना संदेश पारकर यांनी या विजयाचे श्रेय कणकवलीच्या जनतेला आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेने दिलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या विजयामुळे कणकवलीच्या राजकीय वर्तुळात शहर विकास आघाडीचे स्थान अधिक मजबूत झाले असून, नवीन प्रशासनाकडून शहरासाठी मोठ्या विकासकामांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!