कणकवलीत युवा संवाद कार्यक्रम संपन्न
कणकवली : राजकारण हे करिअरसाठी चांगले क्षेत्र नाही, असे युवक-युवतींना भासवले जाते. त्यामुळे युवा पिढी राजकारण या क्षेत्रापासून चार हात लांब राहते. समाजाची सेवा करण्यासाठी राजकारण हे चांगले क्षेत्र आहे. या क्षेत्रात युवा पिढीने आले पाहिजे. समाजात परिवर्तन व्हावे, अशी युवा पिढीची इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी युवापिढीने समाजात काम पाहिजे. गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत युवा पिढीने सहभागी व्हावे, असे आवाहन शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केले.
शहर विकास आघाडीतर्फे माजी आमदार राजन तेली यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री युवा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. पारकर बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, शिंदे शिवसेनेच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, प्रा. दिवाकर मुरकर, तालुकाप्रमुख मंगेश गुरव, राष्ट्रवादी (श.पा.) चे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, विलास साळसकर, हरकुळ बुद्रुकचे सरपंच बंडू ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
पारकर म्हणाले, युवा पिढीने उच्च शिक्षण घेतले पाहिजे. युवा पिढीने घेतलेल्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी झाला पाहिजे. सध्या युग हे आधुनिक आहे. त्यामुळे युवा पिढीने तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे. राजकारणापासून तरुण पिढी लांब राहत असल्याचे दिसून येते. राजकारण क्षेत्र हे चांगले नाही, असा गैरसमज आहे. पण राजकारण वाईट क्षेत्र नाही. या क्षेत्रा माध्यमातून समाजाची व देशाची सेवा करण्याची संधी प्राप्त केले. त्यामुळे या क्षेत्रात तरुण पिढी आले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी पारकर यांनी आपल्या राजकीय प्रवास उलघडून सांगितला.
शहर विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कणकवली शहरातील युवक-युवतींसाठी काय काय करणार यांचे व्हिजन त्यांच्यासमोर मांडले. न.पं.ची निवडणूक झाल्यानंतर आमदार निलेश राणे हे कणकवली शहरातील युवक व युवतींशी संवाद साधून त्यांचे मते जाणून घेणार आहेत, असे राजन म्हणाले.