-8.7 C
New York
Tuesday, January 27, 2026

Buy now

समाजबंध जपत आशिये शाळेत शैक्षणिक साहित्य वितरण

भाजपा उपाध्यक्ष राजेश उर्फ सोनू सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य

कणकवली : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो. याच हेतूने भाजप आणि सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने आशिये येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे कौतुक करताना भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेश उर्फ सोनू सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच सामाजिक मूल्यांची जपणूकही तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा आशिये गावचे सरपंच महेश गुरव, उपसरपंच संदीप जाधव, वरवडेचे उपसरपंच अमोल बोंद्रे, ग्रा. पं. सदस्य प्रदीप घाडीगावकर, केतन घाडीगावकर, संतोष कदम, अनिल घाडीगावकर, किरण सावंत, तसेच माजी सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ सदस्य शंकर गुरव, सदानंद बाणे, भाजप बूथ कमिटी अध्यक्ष सचिन गुरव, मुख्याध्यापिका शिल्पा सावंत, शिक्षक सतीश कदम, स्नेहा सामंत, अंगणवाडी सेविका तनया बाणे, पार्वती बाणे यांसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सोनू सावंत म्हणाले, समाजाने दिलेल्या प्रेमाचे उत्तर देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हीच खरी भेट आहे. शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या प्रगतीस हातभार लागतो.

सरपंच महेश गुरव म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. सोनू सावंत मित्रमंडळाचा हा उपक्रम स्तुत्य असून अशा कार्यातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता वाढते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सतीश कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका शिल्पा सावंत यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!