मालवण : मालवणमध्ये समोर आलेल्या संशयित पैसे प्रकरणाला 24 तास उलटूनही पोलिसांकडून किंवा निवडणूक आयोगाकडून कोणतीही भूमिका घेतलेली नाही. घटनेनंतर एफआयआरची नोंद देखील झालेली नसल्याने स्थानिक पातळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाबाबत आमदार निलेश राणे यांनी आपल्या X (माजी ट्विटर) प्लॅटफॉर्मवरून कडक शब्दांत प्रतिक्रिया देत प्रशासनाला सवाल उपस्थित केले आहेत. राणे म्हणतात की:
“२४ तास होत आले तरी पोलिसांनी किंवा निवडणूक आयोगाने अजूनही काहीच भूमिका घेतलेली नाही. एफआयआर देखील झालेला नाही. संबंधित आरोपी सांगतात की पैसे व्यवसायासाठी होते, मग लगेच त्या व्यवहाराचे नाव, व्यक्ती, इनकम टॅक्स एन्ट्री, जीएसटी नंबर हे सर्व जागेवर सांगायला नको का? केवळ ‘व्यवसायाचे पैसे’ म्हणून सांगून उपयोग नाही, पुरावे सादर करावेच लागतील.”


