कणकवली : राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी बुधवारी प्रचारात दमदार एन्ट्री घेतली. शहरातील व्यापारी, डॉक्टर, वकील, पत्रकार तसेच विविध प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटीगाठींना त्यांनी सुरुवात केली आहे. कणकवलीतील विविध विभागांत प्रत्यक्ष जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत.
यावेळी कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, डॉ. निलेश पाकळे, प्रतिष्ठित नागरिक बापू पारकर, सुशील पारकर, डॉ. अनंत नागवेकर, श्री. मालपेकर यांच्यासह अनेकांनी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्यासोबत संवाद साधला. या भेटी दरम्यान नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.