8.9 C
New York
Saturday, November 22, 2025

Buy now

कणकवलीत ७ वर्षांनंतर ‘न्यू गोल्डन सर्कस’च दणदणीत पुनरागमन

इंडिया गॉट टॅलेंटचे कलाकार, थरारक एक्टर्स आणि मनोरंजनाची पर्वणी

कणकवली | मयुर ठाकूर: कणकवलीकरांसाठी आनंदाची बातमी! तब्बल सात वर्षांनंतर शहरात पुन्हा एकदा न्यू गोल्डन सर्कस ची धमाकेदार एन्ट्री होत आहे. उपजिल्हा रुग्णालयासमोरील मोठ्या पटांगणावर २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत ही भव्य सर्कस दररोज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज राहणार आहे.

सर्कसचा शुभारंभ २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य शोने होणार आहे. त्यानंतर दररोज तीन शो— दुपारी १ वा., सायंकाळी ४ वा. आणि रात्री ७ वा.— आयोजित केले जातील, अशी माहिती सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी दिली. यावेळी व्यवस्थापक जावळा सिंग उपस्थित होते.

मनोरंजनाचा तिहेरी धमाका

श्री. माने म्हणाले, सर्कस हा आपल्या भावविश्वाशी जोडलेला आनंदाचा सोहळा आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच सर्कसची ओढ असते. त्यामुळे कणकवलीत न्यू गोल्डन सर्कसचे पुनरागमन हा प्रत्येकासाठी खास अनुभव असेल.

न्यू गोल्डन सर्कसने आजवर देशातील १२ ते १३ राज्यांत आपली अनोखी छाप सोडली आहे. महाराष्ट्रातही तिच्या खेळांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

इंडिया गॉट टॅलेंटचे स्टार परफॉर्मर्स

या वर्षी सर्कसचा मुख्य आकर्षण ठरणार आहेत इंडिया गॉट टॅलेंट मधील कौशल्यवान कलाकार. त्यांच्या थरारक, रोमांचक आणि हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या ऍक्ट्स कणकवलीकरांसाठी प्रथमच पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय विनोदी कलावंत, जोकर एक्टर्स हवाई कसरती, रिंग परफॉर्मन्सेस आणि रंगतदार नृत्यकला यांचा भव्य संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

कणकवलीकरांसाठी विशेष आवाहन

इतक्या वर्षांनी सर्कस शहरात येत आहे. कणकवलीवासीयांनी परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या थरारक आणि बहारदार सर्कसचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री. माने यांनी केले.

कणकवलीत हिवाळ्याची सुरुवात होत असताना मनोरंजनाच्या या रंगतदार पर्वणीची कणकवलीकर प्रतीक्षा करत आहेत!

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!