कणकवली : अनंतकोटी, ब्रम्हांडनायक, राजाधिराज, योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांचा 48 वा पुण्यतिथी महोत्सव कनकनगरीत रविवार 23 नोव्हेंबर ते गुरूवार 27 नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या महोत्सवानिमित्त नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचा कीर्तन महोत्सव देखील होणार आहे.
रविवार 23 ते गुरूवार 27 नाव्हेंबर या कालावधीत पहाटे 5.30 ते 7.30 वा. समाधीपूजन, काकड आरती, सकाळी 8.30 ते 12.30 वा. सर्व भक्त कल्याणार्थ धार्मिक विधी ‘भालचंद्र महाराज महाभिषेक अनुष्ठान’ दुपारी 12.30 ते 1 वा. आरती, 1 ते 3 वा महाप्रसाद, दुपारी 1 ते 4 वा. भजने, सायं. 4 ते 7.30 वा. कीर्तन महोत्सव, रात्रौ 8 ते 8.15 दैनंदिन आरती असे कार्यक्रम होणार आहेत. तर गुरूवार 27 नोव्हेंबर या दिवशी परमहंस भालचंद्र महाराज यांचा 48 वा. पुण्यतिथी दिन आहे. यानिमित्त पहाटे 5.30 ते 8 वा.
समाधीपूजन, काकड आरती, जपानुष्ठान, सकाळी 8 ते 10.30 वा. भजने, सकाळी 10.30 ते 12.30 वा. समाधीस्थानी मन्युसूक्त पंचामृताभिषेक, दुपारी 12.30 ते 1 वा. आरती, दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद, दुपारी 1 ते 5 वा. भजने, सायं. 5 वा. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची भक्तगण व सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय यांच्या समवेत कणकवली शहरातून भव्य पालखी मिरवणूक, नंतर आरती होणार आहे. रात्रौ 11 वा. ‘पतीव्रतेची पुण्याई’ हे भालचंद्र दशावतार नाट्यमंडळ, हळवल यांचे दशावतारी नाटक होणार आहे. तरी या सोहळ्याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.
10 वा कीर्तन महोत्सव
परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त यंदा 10 वा कीर्तन महोत्सव 23 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत रोज सायंकाळी 4 ते 7.30 वा. या वेळेत होणार आहे. रविवार 23 नोव्हेंबर राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. कौस्तुभ बुवा परांजपे पूणे (विषयः भिष्मप्रतिज्ञा), सोमवार 24 नोव्हेंबर राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. प्रणवबुवा जोशी जालना (विषय गर्वहरण), मंगळवार 25 नोव्हेंबर राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. संदिपबुवा मांडके रामदासी पूणे (विषयः भिम माया), बुधवार 26 नोव्हेंबर राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेशबुवा धानोरकर, पूणे (विषयः रूक्मिणी स्वयंवर), होणार आहे.